महाराष्ट्रराजकारण

आता खुद्द शरद पवारच उतरले पुण्याच्या मैदानात; कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा

काहीही केले तरी पुण्याची कोरोना संख्या कमी होत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवारांच्या उपस्थितीतील शानदार कार्यक्रमात उघडलेले आणि प्रत्यक्षात उपचारांत फेल ठरलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरच्या कामकाजावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. बिघडलेल्या स्थितीला नेमके कोणते घटक जबाबदार आहेत ? जम्बोचा उपयोग काय ? लोकांना दिलासा मिळतो आहे का ? यावरून पवार यांनी स्थानिक प्रशासनाची खरडपट्टी केली.

दुसरीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांपाठोपाठ राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांशी पवार यांनी चर्चा केली. यानिमित्ताने पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी कठोर उपाय आखण्यासाठी पवार यांनी पुढाकार घेतला आहे.

नेमक्‍या कोणत्या उपाययोजना लोकांना धीर द्या, हेही पवारांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्याचवेळी महापालिका आणि प्रशासकीय यंत्रणेतील गोंधळाबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पवार यांच्याकडे तक्रारी केल्या. एवढ्यांवरच न थांबता पवार पुण्यात शनिवारी चार बैठका घेणार आहेत. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे उपस्थितीत राहणार आहेत.