महाराष्ट्रशैक्षणिक

आता घरात बसून परीक्षा होणार, अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परिक्षा लांबणीवर गेल्या होत्या. आता या परीक्षा होणार असून याबाबत आज महत्वाची बैठक पार पडली. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेणार असून 31 अक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रॅक्टिकल परीक्षा होऊ शकतात.

ऑक्टोबर महिन्यात मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न असून विद्यार्थ्यांना घरी बसून परिक्षा देण्यास राज्यपालांनी मंजुरी दिल्याचं सामंत यांनी सांगितलं आहे. परीक्षा कशा घ्यायच्या हा निर्णय कुलगुरू आणि विद्यापीठांनी घ्यायचा होता.

परीक्षा घेण्यासाठी वेगवेगळे पर्याय समोर आहेत. त्यावर चर्चा सुरू असून सोपी पद्धत वापरण्यावर एकमत झालं, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. यामुळे आता या परीक्षा होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.