महाराष्ट्रराजकारण

आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनाही धमकीचा फोन!

 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान उडवून देण्याच्या धमकी काल देणारा फोन आला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील आणखी काही महत्वाच्या नेत्यांना धमकीचा फोन आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आला आहे. तसेच, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन आला आहे.
यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात आघाडी सरकारवर एकामागून एक संकट येताना दिसत आहेच. दरम्यान. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शरद पवारांची वाय बी चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. तसेच, त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशीही बातचीत केली. नेमकी त्यांच्यात काय चर्चा झाली याचे कारण अद्याप समजले नाही आहे.

सुरक्षा यंत्रणा आता सतर्क झाली आहे हे फोन नेमके कुठून येत आहेत, याची खात्री करण्यात येत आहे. यामुळे या नेत्यांची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे.