Newslive मराठी- अभिनेत्री दीपिका पादुकोन सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिचे चाहतेही अनेक आहेत. तसेच तिच्या नावाने फॅन्स क्लब चालवले जातात. सध्या सोशल मिडियावर दोन मेन्यू कार्ड व्हायरल होत आहेत. त्यात दीपिकाच्या नावाने डोसा आणि पराठा थाळी मिळत असल्याची चर्चा आहे.
💪🏽🤣🤣🤣 https://t.co/Kiy84YeJie
— Deepika Padukone (@deepikapadukone) January 2, 2019
दीपिकाच्या नावाची थाली तर पुण्यात एका रेस्ट्रॉरंटमध्ये दीपिका पदुकोण नावाची थाली मिळत आहे. मेनू कार्डमध्ये ‘दीपिका पदुकोण पराठा थाली’ मिळत आहे. या थालीत ग्राहकांना भाजी, राजमा – छोले, दाल मखनी, रोटी, भात, सलाड, पापड, स्वीट डिश मिळणार आहे. या थालीकरता ग्राहकांना 600 रुपये मोजावे लागणार आहे.
व्हायरल झालेल्या या मेन्यू फोटोमध्ये भगत सिंह, युवराज सिंह, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार, यो यो हनी सिंह सारख्या कलाकारांच्या नावाच्या थाली देखील आहेत. खालील फोटो हा अमेरिकेतील टेक्ससमधील ऑस्टिनमधला आहे. येथील डोसा लॅब्स नावाच्या रेस्टॉरंटमध्ये ‘दीपिका पदुकोण डोसा’ मिळत आहे.