कोरोनामहाराष्ट्र

पुण्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने ओलांडला 1 लाखांचा टप्पा!

देशात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. यामध्ये पुण्याची रुग्णसंख्या एक नंबरवर गेली आहे. पुण्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज दिवसभरात तब्बल 1 हजार 764 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा आता 1 लाखांच्याही पुढ़े गेला आहे.

सध्या पुणे जिल्ह्यात 15 हजार 973 रुग्णांवर उपचार सुरू असून, 2 हजार 401 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आजपर्यंतच सुमारे 82 हजार 85 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आली आहे. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 1 लाख 459 वर पोहोचला आहे.

वाढती रुग्णसंख्या हा आता पुणेकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अनेक उपाययोजना करून देखील पुण्यातील रुग्ण संख्या कमी होत नाही. बेडच्या अभावी तसेच ऑक्सिजनच्या अभावी मृत्यू होत आहेत.