महाराष्ट्रराजकारण

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 17 खासदारांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. जगात कोरोना रुग्णांच्या संख्येत भारताचा आता तिसरा नंबर लागत आहे. तर देशात सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील पावसाळी अधिवेशन पार पडले. आता संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू झाले आहे. यामध्ये भाजप खासदार मीनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे, परवेश साहिब सिंह यांच्यासह 17 खासदारांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 17 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सदस्यांमध्ये भाजपचे सर्वाधिक खासदार असून काँग्रेस (वाय आरएस), शिवसेना, डीएमके, या पक्षांच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश असल्याचे समजते.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पावसाळी अधिवेशनाला उशीराने सुरुवात झाली. सर्व खासदारांची कोरोना चाचणी करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर सुरक्षा घेऊन खासदारांना आत सोडले जात होते.