आंतरराष्ट्रीयदेश-विदेश

कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

Newslive मराठी- जगात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर जगभरात या विषाणूवर अनेक वैज्ञानिक नवनवीन संशोधन करत आहे.

आता एकदा कोरोना झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोना होतो की नाही, याबाबत ठामपणे उत्तर मिळाले नाही. मात्र काही वैज्ञानिकांच्या मते एकदा कोरोना झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोना होत नाही.

बोस्टन कॉलेज येथील जागतिक सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमाचे संचालक डॉ. फिलिप लँड्रीगन यांच्या मते हे एक नवीन विज्ञान आहे. आरोग्य तज्ञांच्या मते कोरोनाचा विषाणू परत शरीरात घुसला, तर त्याच्या विरोधात लढण्यासाठी शरीरात काही प्रमाणात प्रतिबंधात्मक शक्ती तयार झालेली असते.

तसेच वैज्ञानिकांच्या मते काही व्यक्ती अशा आहेत, ज्यांचा कोरोना बरा झाला असूनही त्यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. मात्र अशा व्यक्तींमध्ये आधीच्याच कोरोना विषाणू संसर्गातील अवशेष असू शकतात, असे काही वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-देशातील कोरोनाबाधितांनी 15 लाखांचा टप्पा ओलांडला

-व्याघ्र दिन एका दिवसापुरता मर्यादीत राहता कमा नये– मुख्यमंत्री