बातमीमहाराष्ट्र

बचत गटाला एक लाखाचे खेळते भांडवल- देवेंद्र फडणवीस

Newslive मराठी- बचत गटांच्या महिलांसाठी फिरता निधी साठ हजार रुपयांवरून एक लाख रुपये करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

महिला सक्षमीकरणांतर्गत सुमतीबाई सुकळीकर योजनेअंतर्गत बचत गटांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, मुख्यमत्र्यांनी बचत गटांच्या महिलांचे कार्य उत्कृष्ट असल्याचे सांगून ९९ टक्के कर्जाची परतफेड या महिला करीत असून, त्या स्वत: सक्षम होत आहेत.  बचत गटांमध्ये आता ३५ लाख कुटुंबे असल्याने खऱ्या अर्थाने महिला सक्षम होत आहेत. ११ लाख २५ हजार आदिवासी लोकांचे ३६१ कोटींचे खावटी कर्ज माफ केले आहे, असे त्यांनी सांगितले.

श्रीलंकेच्या मुलीने भारतातील शेतकऱ्याच्या मुलाशी केले लग्न

Newslive मराठी’ पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi