कृषीमहाराष्ट्र

आवक घटल्याने कांद्याच्या भावात वाढ

लॉकडाऊननंतर आता हळूहळू जनजीवन पूर्वरत होत आहे. मागणी नसल्याने चाळीत पडून असलेला उन्हाळी कांदाही जास्त आर्द्रता असल्याने सडण्यास सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे देशभरात अति पावसामुळे खरीपातील लाल कांदा खराब होण्यास सुरुवात झाली आहे.

उन्हाळ कांद्याच्या मागणीत वाढ झाल्याने आज लासलगाव येथील मुख्य बाजार समितीत उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त २४५१ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. कांदा दरात जरी सुधारणा झाल्याचे दिसत असले तरी उन्हाळ कांद्याचे चाळी मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या भाव वाढीमुळे शेतकऱ्यांचे थोडे फार नुकसना भरून निघण्यास मदत होणार आहे.

राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या सेन्सेटिव्ह पिक म्हणून कांदा ओळखला जातो. उन्हाळ कांद्याला एप्रिल महिन्यामध्ये सरासरी ६०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाले होते मात्र मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग चांगला भाव मिळेल या अपेक्षेने मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळ कांद्याची चाळीमध्ये साठवणूक केली मात्र वातावरणाच्या फटक्याने हाच कांदा आता खराब होण्यास सुरुवात झाली आहे. एकाबाजूला भाव वाढले आहेत तर दुसरीकडे कांदा खराब देखील होऊ लागला आहे.