मनोरंजनमहाराष्ट्र

मित्रांचा नादच खुळा! मित्राला नोकरी लागली म्हणून पगाराची रक्कम लिहून अभिनंदनाचा फलक

कोरोनामुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंतचा गाव गाडा ठप्प झाला. त्यात अनेकांचा रोजगार गेला आहे. शहरात राहणारी तरुण मुलं गावाकडे परतली. अनेकांना तर आजही नोकरी मिळाली नाही. अशातच माढा तालुक्यातील दारफळ सिना गावातील विशाल बारबोले या तरुणाला साखर कारखान्यात चांगल्या हुद्यावर पाच आकडी पगारी नोकरी मिळाल्याने गावातील मित्र परिवाराने मुख्य चौकात मोठा फलक लावुन आनंद साजरा केला.

माढा तालुक्यातील दारफळ गावचा रहिवासी असलेल्या विशालने दहावी उतीर्ण होऊन आयटीआयचा कोर्स पुर्ण केला होता. पिंपरी येथील बबनराव शिंदे शुगर्स येथे विशाल कर्मचारी नोकरीस लागला. अनेक वर्ष काम देखील केले. मात्र, तिथे मिळणाऱ्या पगारावर तो समाधानी नव्हता. तो मोठा पगार आणि हुद्याच्या तो शोधात असायचा.

अशातच मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे असलेल्या औदुंबरराव पाटील साखर कारखान्यात कर्मचारी भरती निघाली आणि विशाल तिथे गेला. क्रेन ऑपरेटर पदी निवड झाली. यामुळे त्याच्या मित्रांना मोठा आंनद झाला. यामुळे त्यांनी गावात अभिनंदनाचा फलक लावून आनंद साजरा केला.