Newslive मराठी- राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी यांच्या वतीने पिंपरी चिंचवड येथे आज (गुरुवारी) महिला बचत गटांचा उद्घाटन समारंभ व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हजेरी लावून येथे उपस्थित असणाऱ्या महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड परिसरातील महिलांनी चांगला प्रतिसाद दिला.
याप्रसंगी, शहराध्यक्ष वैशाली काळभोर व या प्रभागातले नगरसेवक प्रविण भालेकर व पंकज भालेकर, नगरसेविका संगिता ताम्हाणे आणि पोर्णिमा सोनवणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
दरम्यान, चाकणकर यांनी हिंगणघाट, ओरंगाबाद व माटुंगा रेल्वे स्टेशन या ठिकाणी घडलेल्या निंदनीय गोष्टींवर संवाद साधला. हिंगणघाटमधील आमच्या पिडीत भगिनीच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली.
राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते बाबुराव वायकर यांचा जाहीर सत्कार