महाराष्ट्रराजकारण

विरोधी पक्षांनी जबाबदारीनं वागायला हवं होतं- राज ठाकरे

Newslive मराठी- कोरोनाचं संकट अभूतपूर्व आहे पण त्या काळात सरकारवर टीका करण्याची वेळ नव्हती. दोन्ही सरकारच्या चुका झाल्या पण ती वेळ राजकारण करण्याची नव्हती म्हणून विरोधी पक्षांनी जबाबदारीने वागायला हवं होतं. भविष्यात ह्यावर बोलूअसे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपावर टीका केली आहे

कोरोनाच्या काळात मी घराबाहेर जाणं टाळलं कारण मी बाहेर गेलो असतो तर माझ्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली असती त्यातून संसर्गाची भीती होती पण जे सरकारमधल्या लोकांनी मात्र घराबाहेर पडणं आवश्यक होतं. उद्धव ठाकरे टीव्हीवर दिसत होते, त्या सरकारचा कारभार दिसला नाही. राज्य केंद्राकडे बोट दाखवतंय, केंद्र राज्यांकडे बोट दाखवतंय, पण लोकांना ह्याविषयी घेणं देणं नाही. लोकांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला यातून सोडवा, असे राज ठाकरे म्हणाले.

या सगळ्या गोष्टी आपण 23 मार्चपासून पाहतोय. सुरूवातीला कुणालाच त्याचा अंदाज नव्हता. आज जेव्हा सगळी आकडेवारी पाहतो. परंतु, आज आपण आकडा पाहिला. मागील महिना दीड महिन्यांपासून बाहेर पडताहेत. हा आकडा माझ्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करतो.

130 कोटींच्या देशात 13 लाख रुग्ण आहेत. यात 27 हजार रुग्णांचा मृत्यू झाला. पण हे किती काळ चालवणार आहोत. लोकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यवसाय बुडले आहेत. या आकड्याकडे पाहिलं, तर अख्खा देश लॉकडाउनमध्ये ठेवणं गरजेचं आहे का?. मी मुख्यमंत्री, अजित पवार आणि शरद पवार यांना फोन करून सांगितलं की बस झालं आता. लोकांना वेठीस धरू शकत नाहीत,” असं सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या-

-आपल्याकडे लॉकडाऊन, अनलॉकचा ताळमेळच नाही- राज ठाकरे

-उद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवरच दिसले– राज ठाकरे

-नरेंद्र मोदी त्यांच्यात राजकीय नेतृत्वाची धमक नाही, ते धार्मिक गटाचे नेते- प्रकाश आंबेडकर

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi