बातमी महाराष्ट्र

न्यायालयाने आदेश दिलेत; लवकरच मेगा भरती होईल- मुख्यमंत्री

Newslive मराठी: राज्य सरकारने ७२ हजार मेगा भरतीची घोषणा केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांना मेगा भरतीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना, लवकरच मेगा भरती होईल, न्यायालयानेही निर्णय दिला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून (एसटी) आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकारने मेगा भरती रद्द करावी, अशी मागणी धनगर समाजाच्या संघटनांच्या वतीने करण्यता आली होती. तर, या मेगाभरतीला विरोध करत उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयानेही काही तात्काळ भरतीप्रक्रिया सुरु करण्यास आक्षेप नोंदवला होता.

कोणत्या खात्यात किती जागा?

आरोग्य खाते – 10,568
गृह खाते – 7,111
ग्रामविकास खाते – 11,000
कृषी खाते – 2500
सार्वजनिक बांधकाम खाते – 8,337
नगरविकास खाते – 1500
जलसंपदा खाते – 8227
जलसंधारण खाते – 2,423
पशुसंवर्धन खाते – 1,047

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *