बातमीमहाराष्ट्र

राज्य महिला आयोगाच्या वतीने बचत गटांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

Newslive मराठी   आज गुरुवार दि.25 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोग महाराष्ट्र शासन व राजमाता जिजाऊ महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण अंतर्गत मावळ तालुक्यातील महिला बचत गटांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आला.

या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शहरातील महिला बचत गटांना सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर मदत होईल व महिला बचत गटांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी ही मोठ्या प्रमाणात मदत होईल.

यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीम विजयाताई रहाटकर,लोणावळा नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव,राजमाता जिजाऊ महिला मंच संस्थापक अध्यक्ष सारिकाताई भेगडे, राजमाता जिजाऊ मंचाचे सर्व संचालक मंडळ व शहरातील महिला बचत गटांच्या
प्रतिनिधी उपस्थित होत्या.

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi