Newslive मराठी- अन्यथा रस्त्यावर उतरून निर्वाणीचा लढा पुकारावा लागेल असा इशारा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारला दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील या शेतकऱ्याच्या विधवा पत्नी आणि मुलास पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. या बाबतीत जेष्ठ नेते शरद पवार यांनी अघोषित आणीबाणी पुकारणाऱ्या सरकारने हे वेळीच थांबवावे. असं शरद पवार यांनी ट्वीट केलं आहे.
भाजप सरकारने असंवेदनशीलतेची परिसीमा गाठली आहे. धर्मा पाटील यांनी शासनाच्या अन्यायकारक व अनागोंदी कारभाराला कंटाळून मंत्रालयात आत्महत्या केली. आता मुख्यमंत्र्यांच्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी धर्मा पाटील यांच्या विधवा पत्नी सखूबाई यांना कोठडीत डांबण्यात आले. pic.twitter.com/Syf0stkPVN
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 28, 2018
याबाबत काय म्हणाले शरद पवार असंवेदनशीलतेची परिसीमा गाठली आहे. धर्मा पाटील यांनी शासनाच्या अन्यायकारक व अनागोंदी कारभाराला कंटाळून मंत्रालयात आत्महत्या केली. आता मुख्यमंत्र्यांच्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी धर्मा पाटील यांच्या विधवा पत्नी सखूबाई यांना कोठडीत डांबण्यात आले.
लोकशाहीची मूल्ये पायी तुडवून अघोषित आणीबाणी पुकारणाऱ्या सरकारने हे वेळीच थांबवावे. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून निर्वाणीचा लढा पुकारावा लागेल असंही ते म्हणाले.