महाराष्ट्रराजकारण

पंढरपुरात करण्यात येणाऱ्या आंदोलनाला आमचा पाठिंबा – प्रकाश आंबेडकर

Newsliveमराठी – “माणसांचे आयुष्य कैद करणाऱ्या सक्तीच्या लॉकडाउनला आम्ही सातत्याने विरोध करत आहोत. अशातच आता महाराष्ट्रातल्या ह.भ.प. महाराज, विश्व वारकरी सेनेने कीर्तन, भजनासाठी मंदीरे खुली करण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी पंढरपुरात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या आंदोलनाला मी स्वतः हजर राहून पाठिंबा देणार आहे,” अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे .

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरं आणि धार्मिक स्थळं बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जवळपास गेल्या पाच महिन्यांपासून सर्व धार्मिक स्थळं बंद आहेत. परंतु , देशात आणि राज्यात आला अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून मंदिरं आणि अन्य धार्मिक स्थळं उघडण्याची सातत्यानं मागणी होत आहे. तसंच महाराष्ट्रातल्या ह.भ.प. महाराज, विश्व वारकरी सेनेने कीर्तन, भजनासाठी मंदीरे खुली करण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी पंढरपुरात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या आंदोलनाला प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. “या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. तो दर्शवण्यासाठी मी स्वत: पंढरपूरला उपस्थित राहणार आहे,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत .