आंतरराष्ट्रीयदेश-विदेशलक्षवेधी

राफेलला घाबरला पाकिस्तान! गुगलवर शोधत आहेत माहिती

Newslive मराठी- राफेल विमानाची माहिती अनेक पाकिस्तानी नागरिकांनी गुगलवर सर्च केल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे गुगल सर्चमध्ये राफेल हा ट्रेंड आघाडीवर राहिला. गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानी नागरिकांना राफेल बद्दल कुतूहल होते. त्यामुळे जगातील सर्वोत्तम लढाऊ विमान, राफेल विमानाची किंमत अशी माहिती पाकिस्तानी नागरिक सर्च करत होते.

राफेल नुकतेच भारतात दाखल झाले आहे. राफेलचे फ्रान्समधूनआगमन होण्याच्या दिवसापासून याची उत्सुकता सर्वांना लागलेली दिसली. त्या दिवसापासून राफेल ट्रेंडने सर्च इंजन आणखी सक्रिय केले. पाकिस्तानातील सिंध, बलुचिस्तान, गिलगिट–बाल्टिस्तान, पंजाब अशा विविध प्रांतात हा ट्रेंड संध्याकाळपर्यंत टॉप ट्रेंड बनला. यावरून पाकिस्तान राफेलला घाबरला असल्याचे दिसून येत आहे.

अनेक पाकिस्तानी नागरिकांनी भारतीय हवाई दलाबद्दल सविस्तर माहिती मिळवण्याचाही प्रयत्न केला. एफ–16 आणि राफेल या दोन विमानात कोणते विमान सर्वोत्तम हे जाणून घेण्यासाठी अनेक जणांचा कल दिसून आला. पाकिस्तान भारताबरोबर सतत सीमेवरून कुजबूज करत असतो तसेच चीन बरोबर देखील सध्या तणावाचे वातावरण आहे. यामुळे राफेल हे फायदेशीर ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत; राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर जोरदार टीका

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi