देश-विदेश

पाकिस्तानने भारताला शिकवू नये- ओवेसी

टिम Newslive मराठी: अल्पसंख्यांकांच्या अधिकारांबाबत भारताला पाकिस्तानकडून शिकण्याची आवश्यकता नसून, उलट पाकिस्तानने भारताकडून शिकायला हवे, अशा शब्दात एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सुनावले.

इम्रान खान यांच्या वक्तव्यावर टीका करताना ओवेसी यांनी ट्विट केले आहे की, ‘पाकिस्तानी राज्यघटनेनुसार फक्त मुस्लिम व्यक्ती राष्ट्रपती होऊ शकतो. भारताने मात्र अनेक वंचित समुदायाचे राष्ट्रपती पाहिले आहेत. इम्रान खान यांच्यासाठी ही योग्य वेळ आहे जेव्हा त्यांनी सर्व समावेशक राजकारण आणि अल्पसंख्यांकांच्या अधिकाराबद्दल भारताकडून शिकावे’.

भारतात अल्पसंख्यांकांना इतर नागरिकांप्रमाणे वागणूक मिळत नसल्याचे भारतातील काही लोक म्हणत आहेत. त्यामुळे अल्पसंख्यांकांसोबत कसे वागायचं हे आम्ही मोदी सरकारला दाखवू. पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांना सुरक्षित वाटेल आणि त्यांना समान अधिकार मिळतील, असे वक्तव्य इम्रान खान यांनी केले होते.