मनोरंजनमहाराष्ट्र

पालकांनो मुलांना स्त्रियांचा सन्मान करायला शिकवा- अनुष्का शर्मा

उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे सलग दोन दिवस घडलेल्या सामूहिक बलात्कार (Gang Rape) प्रकरणांमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनांतील दोन्ही पीडितांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात असतानाच बॉलिवूड कलाकारही आपला राग व्यक्त करत आहेत.

मुलांना स्त्रियांचा सन्मान करायला शिकवणे ही पालकांची जबाबदारी आहे. असे म्हणत अनुष्का शर्माने देखील आपला संताप व्यक्त केला आहे. अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहीत आपला राग व्यक्त केला आहे. आपल्या समाजात मुलाचा जन्म झाल्यावर त्याला ‘विशेषाधिकार’ मिळतो. आपल्या मुलांना स्त्रियांचा आदर करण्यास शिकवणे ही कुटुंबाची जबाबदारी आहे. आपल्या समाजात पुरुष मुलाला ‘विशेषाधिकार’ म्हणून पाहिले जाते. परंतु स्त्रियांकडे विशेषाधिकार म्हणून न पाहता तिलाही विशेषाधिकार देण्यात यावा स्त्रियांना सुरक्षित वाटू द्या असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर सामूहिक बलात्कार घटनांवर देखील अनुष्काने पोस्ट लिहीत संताप व्यक्त केला होता. आधी हाथरस आणि काहीच वेळाने बलरामपूरच्या या दुष्कृत्याची माहिती मिळाली. या जगातील हे राक्षस एखाद्या जीवाचे असे हाल करण्याचा विचारच कसा करू शकतात? यांना काही भय आहे की नाही? असा संतप्त सवाल तिने या पोस्टमधून विचारला आहे.