महाराष्ट्र राजकारण

पार्थ पवारांनी दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा, म्हणाले…

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यावर सोशल माध्यमातून अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनीही मोदी यांचं ट्विट करून अभिष्टचिंतन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७० वा वाढदिवस आहे.

यानिमित्तानं मोदी यांचं अभिष्टचिंतन केलं जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींना शुभेच्छा दिल्या जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनीही मोदींना ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना राष्ट्राची सेवा करण्यासाठी उत्तम आरोग्य आणि शक्ती मिळो, असं म्हणत पार्थ पवार यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

पार्थ पवार यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतासारख्या महान लोकसत्ताक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला निरोगी व दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा, महाराष्ट्राला तसंच समस्त देशवासियांना न्याय देण्याचं काम आपल्याकडून सदैव होईल, अशी अपेक्षा आहे,” अशी अपेक्षाही अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *