महाराष्ट्रराजकारण

पार्थचे मत वैयक्तीक ती राष्ट्रवादीची भूमिका नाही- अजित पवार

सर्वोच्च न्यायलयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला दिलेल्या स्थगिती विरोधात मराठा संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून राज्यात आंदोलने सुरू झाली आहेत. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणासाठी आपण सर्वोच्च न्यायलयात जाणार असे ट्विट केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

याबाबत पत्रकारांनी अजित पवार यांना विचारले असता पार्थ यांचे मत आणि भूमिकेशी राष्ट्रवादी काँग्रेसचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. मराठा आरक्षणाबाबत पार्थ पवार यांनी व्यक्त केलेले मत हे त्याचे वैयक्तिक असून पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. ती राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. प्रत्येक वेळेस त्याच्या ट्विटबाबत प्रतिक्रिया देण्यापेक्षा आपल्याला इतरही महत्त्वाची कामे आणि जबाबदाऱया असल्याचे ते म्हणाले.

पार्थ पवार याच्या ट्विटबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. आजची पिढी ट्विटद्वारे आपले मत व्यक्त करते. पार्थनेही त्याचे मत व्यक्त केले. प्रत्येकाला स्वतःची मत आहेत कोणी काय ट्विट करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण किंवा इतर घटकांना त्यांचा न्याय हक्क मिळालाच पाहिजे.