आंतरराष्ट्रीयकोरोना

भारतातील ऑक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा

Newslive मराठी- भारतात ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञांच्या समितीने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केली.

संपूर्ण मूल्यांकनानंतर सब्जेक्ट एक्सपर्ट समितीच्या तज्ज्ञांनीसेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनला एक शिफारस केली आहे. यामध्ये सिरम इन्स्टीट्यूला ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यास सांगितलं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं दिली.

या आठवड्याच्या सुरुवातीला समितीने सिरम इन्स्टिट्य़ूटला लसीच्या वैद्यकीय चाचणीसाठी सुधारित प्रोटोकॉल तयार करण्यास सांगितलं होतं. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ॅस्ट्राझेनेकाबरोबर या लसीला विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे.

ऑक्सफर्डच्या या लसीनं आतापर्यंत चांगली प्रगती केली आहे. तसंच ऑक्सफर्डच्या ज्या लसीवर संशोधन सुरू आहे त्याचे सुरूवाती निकाल उत्तम आहेत. तसंच ही लस सुरक्षितही आहे अशी माहिती लॅन्सेन्ट मेडिकल जर्नलनं आपल्या अहवालात दिली आहे. ऑक्सफर्डच्या संशोधकांसोबत भागीदार असणारी जगातील सर्वात मोठी लसनिर्मिती कंपनी सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी सुरूवातीच्या चाचणीमध्ये लसीचे सकारात्मक निकाल आले असून आम्हाला याचा प्रचंड आनंद असल्याचं म्हटलं होतं. भारताच्या दृष्टीने या लसीचं यशस्वी होणं महत्त्वाचं आहे.

कारण या लसीसाठी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. जगभरात अनेक लसी विकसित केल्या जात असून ऑक्सफर्डची लस त्यापैकीच  एक आहे. ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्याचं यश आता फार महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-ऑक्सफर्डच्या लसीच्या मानवी चाचणीची परवानगी टाळली; सीरम इन्स्टिट्यूटला मोठा धक्का

-जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 70 लाखांवर

-आपल्याकडे लॉकडाऊन, अनलॉकचा ताळमेळच नाही- राज ठाकरे

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi