बारामतीमहाराष्ट्रराजकारण

पवारसाहेब काँग्रेससोबत पुन्हा गेले; याचा खेद वाटत आहे- नरेंद्र मोदी

Newslive मराठी-  काॅंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी जेव्हा शरद पवार यांनी प्रयत्न केला तेव्हा कॉंग्रेसने त्यांचा अपमान करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. ज्या काँग्रेसने त्यांना पक्षाबाहेर काढले त्याच काँग्रेससोबत आज पवारसाहेब पुन्हा गेले, याचा खेद वाटत आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

बारामती लोकसभा मतदारसंघातील बूथ कार्यकर्ते संपर्क अभियानात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे मोदींनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यावेळी मोदी बोलत होते.

दरम्यान, शरद पवार यांच्याबद्दल आपल्याला व्यक्तिगत आदर आहे. असंही मोदी यावेळी म्हणाले,