महाराष्ट्रराजकारण

धार्मिक स्थळांबाबत लोक भावनिक, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही- राजेश टोपे

राज्यात कोरोनावर प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विनाकारण गर्दी होणार नाही यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. यामुळे राज्यातील सर्व धार्मिक स्थळ बंद ठेवण्यात आली आहेत. राज्यातील मंदिरे बंद असल्याने पुजारी आणि मंदिराच्या आसपासचे व्यावसायिक नाराज आहेत. तसेच राजकीय नेत्यांकडून धार्मिक स्थळं उघडण्याबाबत मागणी होताना दिसून येत आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारतर्फे धार्मिक स्थळं उघडण्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. धार्मिक स्थळांबाबत लोक भावनिक असतात. त्यामुळे तिथे सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणार नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. जर काटेकोरपणे पालन केले तर धार्मिक स्थळं सुरू करण्यास कोणी विरोध करणार नाही. मात्र ईश्वर हा सर्वत्र आहे. त्यामुळे थोडी सबुरी बाळगू, वेळ लागला तरी हरकत नाही, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्य सरकारने निर्णय न घेतल्याने त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली होती. मंदिरे खुली करावी असं आपलंही मत असल्याचं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं होते.