आंतरराष्ट्रीयकोरोना

उंच असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका जास्त, संशोधकांचा दावा

Newsliveमराठी – जगभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी शक्य ते सर्व उपाय अंमलात आणले आहेत.

असं असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने काही आठवड्यांपूर्वी हवेमधूनही करोनाचा संसर्ग होऊ शकतो यासंदर्भातील संशोधनामध्ये सत्यता असल्याचे सांगितल्यानंतर कोरोनाबद्दलची भिती आणखीनच वाढली आहे.

त्यातच आता युनायटेड किंग्डम, नॉर्वे आणि अमेरिकेतील संशोधकांनी कोरोना संसर्गाचा थेट संबंध व्यक्तीच्या उंचीशी असल्याचा दावा केला आहे. कोरोनाचा संसर्ग कशामुळे होऊ शकतो यासंदर्भात संशोधन करणाऱ्या या संशोधकांनी आपल्या प्रयोगाच्या निष्कर्षामध्ये इंग्लंड आणि अमेरिकेत हवेच्या माध्यमातून करोना संसर्ग होत असल्याचे म्हटले आहे.

त्याचप्रमाणे उंची जास्त असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा धोका अधिक असल्याचेही या संशोधकांनी म्हटलं आहे. नॉन प्री रिव्ह्यूड प्रकारचे जर्नल असणाऱ्या मेडीयारेक्सिव्हमध्ये (Medrxiv) छापून आलेल्या या संशोधनाच्या अहवालानुसार सहा फूट किंवा त्याहून अधिक उंची असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे.

उंचीने लहान असणाऱ्या व्यक्तींपेक्षा उंच व्यक्तींना करोनाचा संसर्ग लवकर होऊ शकतो असं संशोधनामधून दिसून आल्याचं संशोधकांचे म्हणणं आहे.