कोरोनादेश-विदेश

ई-पास बंद करण्यासाठी राज्य सरकारविरोधात उच्च न्यायालयात याचिका

Newsliveमराठी – सध्या राज्यभर ई-पासचा गोंधळ सुरु आहे. प्रवासासाठी ई-पास सक्तीचा आहे, परंतु सर्वसामान्य नागरिकांना ई पास मिळत नाही आणि एजन्ट मार्फत गेले तर लागेच ई पास मिळतो, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ई-पास चा मूळ उद्देश सफल होत नसून नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने हि ई-पास पद्धत पूर्णपणे बंद करावी”, अशी विनंती करणारी जनहित याचिका आज भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मयुरेश जोशी यांनी राज्य सरकारविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

“गेले काही महिने सर्वसामान्य जनतेला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाहनाने प्रवास करण्यासाठी ई-पास सक्तीचा करण्यात आला आहे. परंतु अनेक वेळा मेडिकल इमर्जन्सी, नातेवाईकांचे मयत, व्यावसायिक मीटिंग अशी अत्यावश्यक कारणे देऊन सुद्धा ई-पास मिळत नाही. कधी एखाद्या सध्या क्षुल्लक कारणासाठी पास मिळतो, कधी तसाच पडून राहतो तर काही फालतू कारण देऊन रिजेक्ट केला जातो. ईपास मान्य किंवा अमान्य करण्यासाठी सिस्टम मध्ये कोणताही योग्य समन्वय नाही”, असे दिसून आल्याचे मत मयुरेश जोशी यांनी मांडले आहे .