राजकारण

सेल्फी काढायला खड्डाच राहणार नाही- चंद्रकांतदादा पाटील

टिम Newslive मराठी : शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यामुळे मराठा आरक्षण दिल्याने विरोधक आता हतबल झाले असून त्यांनी सेल्फीसारखे कार्यक्रम सुरू केले आहेत, असा टोला महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला. ते कराड येथे सर विश्वेश्वरय्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्याधुनिक यंत्रणेचा वापर सुरू केला आहे. सहा कोटींचे मशिन आणले असून त्याद्वारे नाशिक जिल्ह्यातील तळवळ येथे रस्त्याचे काम सुरू आहे. ते मशिन संपूर्ण रस्ता खरवडत जात असून खरवडलेल्या रस्त्याच्या डांबर व साहित्यात विशिष्ट प्रकारचे केमिकल मिश्र केल्यास त्यातूनच पुन्हा रस्ता तयार होत आहे. असं पाटील म्हणाले

मशिन दिवसाला एक किलोमीटर असा रस्ता तयार करते. तो रस्ताही 20 वर्षे टिकेल असा असेल. त्यामुळे विरोधकांनी ठरवले त्या रस्त्याला खड्डा मारून सेल्फी काढायचा तरीही रस्त्यावर खड्डा मारू देत नाही, असा टिकावू रस्ता होईल. तो प्रयोग यशस्वी झाला की राज्यभर त्याचा वापर होईल. मराठा आरक्षण झाले, कर्जमाफी दिल्यामुळे विरोधक हतबल आहेत. त्यामुळे सेल्फीसारखे कार्यक्रम सुरू असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.