आंतरराष्ट्रीयबातमी

पंतप्रधानांची ग्वाही; शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही…

Newslive मराठी-  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्यात 30 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याची पंतप्रधान मोदींनी दखल घेतली असून त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असे मोदींनी म्हटले आहे. तसेच शहीदांच्या कुटुबीयांसोबत संपूर्ण देश आहे व जखमी जवानांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.

दरम्यान, उरी हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असून हल्ल्यानंतर काश्मीरच्या दक्षिण भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi