कोरोनामहाराष्ट्र

पुण्यात जनता कर्फ्यू लागू होण्याची शक्यता; अजित पवारांनी दिला मोठा निर्णय

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे पुण्यात आढळत आहेत. या जीवघेण्या कोरोनामुळे राज्यावर मोठं संकट कोसळलं आहे. या सगळ्यात आता राज्य अनलॉकच्या प्रक्रियेत आहेत. पण असं असलं तरी कोरोनाचा धोका काही कमी होताना दिसत नाही. तो वाढतच चालला आहे. पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे गरज पडल्यास पुण्यात पुन्हा जनता कर्फ्यू लागू करा अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहे.

त्यामुळे आता पुण्यात पुन्हा एकदा कडकडीत लॉकडाऊन होणार असल्याची चिन्ह आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली होती. यामध्ये या संबंधी चर्चा झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी देखील पुण्यात बैठका घेतल्या होत्या.

वाढत्या रुग्ण संख्येमुळे शरद पवारांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. राज्य अनलॉक होत असलं तरी कोरोनाचा धोका वाढतोय. त्यामुळे गरज भासल्यास पुण्यात जनता कर्फ्यू लागू करणार असा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांनी आता तरी काळजी घेतली पाहिजे. नाहीतर भविष्यात पुण्याची अवस्था बिकट होणार आहे.