आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

‘माझ्यासाठी प्रार्थना करा’; संजय दत्तची चाहत्यांना विनंती

सध्या बॉलिवूडमधून अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. अनेक कलाकारांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. अभिनेता संजय दत्तने देखील कोरोनाची तपासणी केली असता, तपासादरम्यान त्याला फुप्फुसाचा कर्करोग असल्याची माहिती समोर आली आहे.

संजय दत्तने स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. या बातमीनंतर बॉलिवूडमध्ये सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी तो रुग्णालयात तपासणीसाठी गेला होता. त्यानंतर आता संजय दत्त कोकिलाबेन रुग्णालयात जाण्यासाठी रवाना होत आहे.

संजय दत्तने स्वतः ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. यावेळी त्याने आपल्या चाहत्यांना विनंती केली आहे. माझ्यासाठी सर्वांनी प्रार्थना करा, संजय दत्तने आपल्या ट्विटमधून आपली भावना व्यक्त केली आहे. संजय दत्तला फुप्फुसाचा कर्करोग असून तो चौथ्या स्टेजवर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर संजय दत्तला अमेरिकेला हलविण्यात येणार असल्याची चर्चा होत आहे.

हा कठीण काळ आहे. याआधीही संजय आणि त्याच्या परिवाराने कठीण प्रसंगाशी सामना केला आहे. संजयने नेहमी या परिस्थितीशी धैर्याने सामना केला आहे. हा काळ देखील निघून जाईल, अशी भावना त्याची पत्नी मान्यता दत्तने व्यक्त केली आहे.