बातमीमनोरंजन

प्रीती झिंटाच्या सेक्रेटरीचे निधन

Newsliveमराठी – अभिनेत्री प्रीती झिंटाचे सेक्रेटरी प्रसाद राव यांचे निधन झाले आहे. प्रीतीने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती देत प्रसाद यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच प्रीती झिंटाने पोस्टमध्ये २०२० हे वर्ष क्रूर असल्याचे देखील म्हटले आहे.

प्रीतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रसाद राव यांच्या सोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने, ‘हे वर्ष क्रूर ठरले आहे. मला कधी वाटले नव्हते की या वर्षात असं काही घडेल. प्रसाद तुझ्यावर माझे प्रचंड प्रेम आहे’ असे म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रीतीच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे. दीया मिर्झाने ‘माझा यावर विश्वासच बसत नाही’ असे म्हटले आहे. तर बॉलिवूड फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने ‘मला ऐकून दु:ख झाले. मला आजही आठवते ते चित्रपटाच्या सेटवर आल्यावर सतत हसत असायचे. तसेच त्यांचे कामही चांगले होते’ असे म्हटले आहे.