बारामतीमहाराष्ट्र

बारामती पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची तयारी

Newslive मराठी- (बारामती प्रतिनिधीः रणजीत कांबळे) बारामती शहरातील भिगवण रोडवरील सराफ होंडा शोरुमच्या पाठीमागे दि.13 फेब्रुवारी रोजी झालेल्या वृक्षतोडसंदर्भात जळोची तलाठी यांनी पंचनामा करत रिपोर्ट तहसिलदार यांकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर केला आहे.

पंचनाम्यात 30 ते 40 वृक्षांची विना परवाना तोड केल्याचे नमुद करण्यात आले आहे. दरम्यान, बारामती आरपीआय शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, शहर सचिव सम्राट गायकवाड आणि वृक्षप्रेमी दयावान दामोदरे यांनी या अवैध वृक्षतोडी विरोधात दि.13 फेब्रुवारी 2020 रोजी प्रांताधिकारी, तहसिलदार आणि मुख्याधिकारी यांना याबाबत तक्रारी अर्ज करीत संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती.

यानुसार बारामतीचे तहसिलदार यांनी याची दखल घेत जळोचीचे तलाठी यांना याप्रकरणी पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जळोचीचे तलाठी यांनी पंचनामा करीत रिपोर्ट दि.14 फेब्रुवारी 2020 रोजी सादर केला आहे.

सदर रिपोर्टनुसार संबंधित नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगम मताने 30 ते 40 वृक्षांची वृक्षतोड झाल्याचे समोर आले आहे. आता संबंधित बारामती नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर आणि वृक्षतोड करणाऱ्यांवर कोणती कारवाई होईल, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बारामती शहरात मोठ्या प्रमाणावर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर वृक्षतोड; कारवाईची मागणी

एसीसी फायटर्स ठरला बीपीएलचा पहिला मानकरी!

नागरिकांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात सिद्धार्थ शिरोळे यांनी घेतली बैठक