आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

चीनकडून युद्धाची तयारी सुरू, सैनिकांना दिल्या महत्वाच्या सूचना

भारत आणि चीनमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. सीमारेषेवरून सध्या हा वाद सुरू आहे.गेल्या काही महिन्यापासून चीन समुद्रात युद्धाचा सराव करत असताना दिसून येत आहे. चार आठवड्यांच्या आत चीनने आता चौथ्यांदा समुद्रात युद्धसराव सुरू केला आहे. आता तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी युद्धाचीच तयारी सुरू केल्याचे दिसून आले आहे. तसेच जिनपिंग यांनी चिनी सैनिकांना एक पत्र ही पाठवले आहे.

जिनपिंग यांनी सैनिकांना पाठवलेल्या पत्रात सैनिकांना आपल्या कुटुंबियांसाठी अखेरचा संदेश लिहण्याचे आवाहन केले आहे, यामुळे युद्धाची घोषणा कधीही होण्याची शक्यता आहे. फुजियान प्रांतात असलेल्या जवानांना हे आवाहन करण्यात आलेले आहे. शी जिनपिंग यांच्या पत्राची बातमी ‘तैवान टाइम्स’ या वृत्तपत्रात छापून आली आहे.

व्हिएतनामला लागून असलेल्या समुद्रात चीनने बॉम्बवर्षाव करणारी विमाने उभी केली आहे. या पार्श्वभूमीवर व्हिएतनामचे राजदूत यांनी भारताच्या परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांची भेटही घेतली होती. व्हिएतनाम लागून असलेल्या समुद्रात मोठ्या प्रमाणात तेल आणि गॅसचा साठा आहे. त्याच्या उत्खननासाठी व्हिएतनाम भारतासोबत भागीदारी करणार आहे. यामुळे हा वाद अजून वाढला आहे.