महाराष्ट्रलक्षवेधी

पुण्यात जोरदार पावसाची हजेरी

पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने शहरात आज सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाने उघडीप घेतली होती. त्यामुळे शहरात उकाडाही जाणवू लागला होता. दरम्यान शनिवारी पुन्हा पावसाने हजेरी लावत सोसाट्याचे वारे वाहत आहे.

त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटसह पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. रविवाररी सुद्धा शहरात मेघगर्जनांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. गेल्या दोन दिवसांनपासून पुण्यातील कमात तापमानात वाढ होत असतानाची नोंद झाली.

त्यामुळे उकाडाही पुणेकरांना अनुभवावा लागला. तर शनिवारी सकाळपासूनच हवामान कोरडे होते व उन्हाचे चटके जाणवत होते. मात्र सायंकाळी अचानक पावसाला सुरूवात झाली आणि शहरात पावसाच्या जोरदार सरी पडल्या. त्यामुळे पावसाचा अंदाज न घेता बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. येणाऱ्या काही दिवसात पाऊस वाढणार आहे.