महाराष्ट्रराजकारण

पंतप्रधानांनी सांगूनही मंत्री राजीनामा देत आहेत- संजय राऊत

शिवसेना भाजपपासून वेगळी झाल्यापासून शिवसेना नेते संजय राऊत हे भाजपवर जोरदार टीका करत आहेत. आता एनडीएतील शिरोमणी अकाली दलानेही कृषिविषयक विधेयकांचा निषेध करीत अकाली दलाच्या हरसिमरत कौर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट करूनही मंत्री राजीनामा देत आहेत. याचाच अर्थ काहीतरी गडबड नक्कीच आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले, कृषिविषयक विधेयकांवरून पंजाबमधील शेतकऱयांमध्ये नाराजी आहे. पंजाबमधील शेतकरी संतप्त आहेत, याचाच अर्थ संपूर्ण देशातील शेतकऱयांमध्ये संताप आहे. महाराष्ट्र पंजाबसोबत आहे. पंजाबनंतर आता हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातही शेतकऱ्यांची निदर्शने सुरू होतील.

आम्ही खोटं बोलत होतो. शिरोमणी अकाली दल खोटं बोलत असेल तर मग हरिश्चंद्र कोण आहे, असा सवाल राऊत यांनी केला. कृषीविषयक विधेयकांवरून आता सर्वांशी चर्चा केली जाते. हे विधेयक निवड समितीकडे पाठवायला हवे. या मुद्दय़ावर आम्ही शरद पवारांशी चर्चा करू. कॉंग्रेस आणि सर्कजण एकत्रितपणे निर्णय घेऊ, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.