महाराष्ट्र

आता जुमलेबाजी चालणार नाही- पृथ्वीराज चव्हाण

Newslive मराठी-  मोदी सरकारने दररोज नवनवे जुमले आणले तरी येत्या लोकसभा निवडणुकीत देशात परिवर्तन आलेले दिसेल. चौकशीनंतर राफेलप्रकरणी अंतिम सत्य बाहेर येईल असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केले.

केंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. विकासाचे मुद्दे नसल्यामुळे आता रोज नवीन जुमले बाहेर काढून मतदारांना आकर्षित करण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. जनतेला जुमलेबाजी करणारे सरकार असल्याचे लक्षात आले आहे. गरीब शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही.

सवर्णांना आरक्षण देणारे विधेयक हा ही एक निवडणुकीचा जुमला आहे. न्यायालयात हे कुठपर्यंत हे टिकेल, हे पाहावे लागेल. राफेल प्रकरणात मोठा घोटाळा झाला आहे.  यातून अंतिम सत्य बाहेर येईल व सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा चव्हाण यांनी यावेळी दिला.

दीक्षाभूमी येथून प्रदेश काँग्रेसतर्फे जनसंघर्ष यात्रेच्या अंतिम टप्प्याला सुरूवात झाली. या जनसंघर्ष यात्रेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे महासचिव  मुकूल वासनिक, आदी नेते  उपस्थित होते.