Newslive मराठी- पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच ज्योतिरादित्य सिंधिया यांची पक्षाने नियुक्ती करत त्यांच्याकडे पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील एन्ट्रीबरोबरच ज्योतिरादित्य सिंधिया, के. सी. वेणुगोपाल यांचीही पक्षाने सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. या निवडी करताना `आमच्यामध्ये `उत्साह संचार’ला आहे’ असे पक्षाने नमूद केले आहे.
दरम्यान, के. सी. वेणुगोपाल यांची कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करीत, त्यांच्याकडे कर्नाटकची जबाबदारी देण्यात आली आहे.
Congress President @RahulGandhi addresses the media in Amethi on the upcoming campaign for Uttar Pradesh & the general elections. #AmethiKiPragati pic.twitter.com/mLXcVaHzNT
— Congress (@INCIndia) January 23, 2019