आंतरराष्ट्रीय देश-विदेश राजकारण

प्रियंका काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्याने भाजपची घबराट वाढली आहे- राहुल गांधी

Newslive मराठी-  प्रियंका गांधी हिच्या राजकारण प्रवेशामुळे भाजप घाबरलेलं आहे, असा दावा राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

प्रियंका आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांची नियुक्ती ही काही निवडणुकीच्या दोन महिन्यांपुरती उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आलेली नाही. तर काॅंग्रेसची गरिबांसाठीची विचारधारा ही पुन्हा या राज्यात प्रवाही करण्यासाठी दोघेजण काम करतील, असे राहुल यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, काॅंग्रेस आपली लढाई आक्रमकपणे खेळणार असली तरी त्यासाठी मायावती आणि अखिलेश यांची मदत घेण्यास आम्ही तयार आहोत. भाजपला हरविण्यासाठी एकत्रित लढाईसाठी या दोघांची इच्छा असेल तर बोलणी सुरू करता येतील, असेही राहुल यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *