देश-विदेशबातमीशैक्षणिक

विद्यार्थ्यांच्या बरोबर आता प्राध्यापकांनाही नकोय परीक्षा! याचिका दाखल

Newslive मराठी- राज्यात कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेयच्या की नको यावर एकमत होत नाही. यावरून राज्य व केंद्र सरकारमध्ये वाद देखील बघायला मिळाला. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना परीक्षा घेणे शक्य नाही. आयोगाच्या निर्णयाप्रमाणे राज्यात जवळपास 11 लाख विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल. अनेक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी दूरचा प्रवास करावा लागेल. जे सद्य:स्थितीत शक्य नाही. एका परीक्षा कक्षात 40 विद्यार्थी असतात. सद्य:स्थितीत अंतराच्या निकषांचा विचार करता 20 विद्यार्थ्यांना वर्गात बसवावे लागेल. त्यानुसार 60 ते 70 हजार प्राध्यापकांना पर्यवेक्षक म्हणून काम करावे लागेल.

विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. विविध राज्यांतील विद्यार्थी, युवासेनेने दाखल केलेल्या या याचिकेत आता ‘परीक्षा नको’ अशी भूूमिका मांडत प्राध्यापक संघटनेनेही हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आता प्राध्यापकही उतरले आहेत. प्राध्यापकांच्या ‘महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन’ (एमफुक्टो) या प्राध्यापक संघटनेने सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. यामुळे आता शिक्षकांना देखील परीक्षा नको आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-अंतिम वर्षांच्या परीक्षा होणारच- युजीसी

-मराठा तरुणांना आर्थिक दुर्बल 10 टक्के आरक्षण नाही; सरकारी जीआरवर विनोद पाटील आक्रमक