महाराष्ट्रराजकारण

अहमदनगर-बीड-परळी रेल्वेला थकीत निधी तातडीने द्या- पंकजा मुंडे

सध्या कोरोनामुळे अनेक मोठ्या प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली आहे. नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाच्या कामाचा 377 कोटी रूपयांचा निधी सध्या राज्य सरकारकडे थकीत आहे. बीड जिल्हयाच्या सुपरफास्ट विकासात मानाचा तुरा असणाऱ्या या रेल्वेच्या कामाकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष, ही तर बीडच्या विकासाला खीळ आहे अशा शब्दांत पंकजाताई मुंडे या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग जिल्हयातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे ते स्वप्न होते. या रेल्वेमार्गासाठी केंद्र आणि राज्याने अर्धा अर्धा वाटा देण्याचे प्रस्तावित आहे. केंद्र सरकारने आपल्या वाट्याचा निधी प्रकल्पाला दिला आहे.

त्या निधीतून सध्या काम सुरू आहे, परंतु राज्य सरकारकडे या प्रकल्पाचा सन 2019-20 या आर्थिक वर्षांचा 228 कोटी आणि सन 2020-21 मधील 149 कोटी असा एकूण 377 कोटी रुपयांचा निधी थकीत आहे, असे खासदार प्रितम मुंडे यांनी रेल्वे अधिका-यांच्या घेतलेल्या व्हर्चुअल आढावा बैठकीतून उघड झाले आहे. या रेल्वेमुळे बीडच्या विकासात मोठी भर पडणार आहे, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.