कोरोनामहाराष्ट्र

नागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. यामुळे नागपुरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यू घेण्याचा निर्णय महापौर संदीप जोशी यांनी घेतला आहे. अनेक व्यापाऱ्यांनी या दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूला समर्थन दर्शवले आहे. तर नागरिकांनी गरज नसल्यास घरातच राहण्याचं आवाहन महापौरांनी केलं आहे. दरम्यान जनता कर्फ्यूमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी, विद्यार्थ्यांनी सोबत ओळखपत्र बाळगावे असं सांगण्यात आले आहे.

नागपुरात कोरोना संसर्ग वाढत असताना नागरिक महापौरांच्या जनता कर्फ्युच्या आवाहानला कसा प्रतिसाद देतात. व्यापारी या जनता कर्फ्युला कशी साथ देतात हे महत्वाचं ठरणार आहे. महापौर संदीप जोशी याबाबत म्हणाले जनता कर्फ्यू म्हणजे जनतेने स्वयंस्फूर्तीने ठेवलेला बंद. ह्या शहराचे आरोग्य ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.

कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. दोन दिवस का होईना, आपल्या वागण्याने जर या संक्रमणावर ब्रेक लागत असेल तर आपण ते या शहरासाठी करायलाच हवे. शहरातील सर्व जनप्रतिनिधींच्या आग्रहाखातर नागपूर महानगरपालिकेने ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले.