कोरोनामहाराष्ट्र

पुणेकरांनो मास्कचे भान पाळा, अन्यथा हजार रुपये दंड भरा- अजित पवार

राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कमी झालेले नाही. त्यातच देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस होत असलेली वाढ चिंतेचा विषय बनत आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या आकडेवारी अग्रस्थानी असलेल्या मुंबईला मागे ढकलत पुण्यांना अव्वल स्थान काबिज केले आहे. पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत.

राज्य सरकारच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील अनेक उद्योगधंदे शिथिलता देऊन सुरु करण्यात येत आहेत. त्याचमुळे राज्यातील नागरिकांची अशी चुकीची धारणा झाली आहे कि कोरोनाचे संकट टळले आहे आणि त्यांनी मास्कचा वापर करणेच सोडले आहे. मात्र हा धोका मोठा आहे.

पुण्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेत संपूर्ण पुणे जिल्ह्यात मास्क अनिवार्य असून त्याचा वापर न केल्यास हजार रुपये दंड आकारण्याबाबतचा विचार सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. त्याशिवाय लोक नियम पाळणार नाहीत.