आंतरराष्ट्रीयदेश-विदेश

 रेल्वेचा सात कोटी खर्च ‘डब्यात’ 

Newslive मराठी-  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर रुग्णांवरील उपचारासाठी रेल्वे खात्याने विलगीकरण कक्षात रूपांतरित केलेले 892 प्रवासी डबे वापराविना पडून आहेत. कोरोनाबाधितांना सध्या पालिका, राज्य सरकार आणि खासगी संस्थांनी तयार केलेल्या करोना केंद्रांमध्ये ठेवण्यात येत असून त्या केंद्रांमध्येही अनेक खाट विनावापर पडून आहेत.

त्यामुळे रेल्वेच्या या विशेष डब्यांचा वापरच होत नाही. त्यामुळे रेल्वेने विलगीकरण कक्षासाठी केलेला सात कोटींचा खर्चडब्यातगेला आहे.

कोरोना रुग्णसंख्या हाताबाहेर गेल्यास रेल्वे डब्यांचे विलगीकरण डब्यांत रूपांतर करण्याचा निर्णय केंद्र सरकार रेल्वे मंत्रालयाने मार्च अखेरीस घेतला. मध्य पश्चिम रेल्वेने मुंबईतील आपल्या कारखान्यांत हे डबे तयार केले.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागासह, पुणे, सोलापूर यांसह विविध विभागाकडून एकूण 482 डब्यांच्या निर्मिती करण्यात आली. तर पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ 40, महालक्ष्मी कार्यशाळेत 35, मुंबई सेन्ट्रल विभागाकडून 85 अशा 410 डब्यांची निर्मिती करण्यात आली. या डब्यांत खाट, वैद्यकीय उपकरणे, प्रसाधनगृहाची व्यवस्था होती.

महत्वाच्या बातम्या- 

-पाच राफेल विमानांचे भारताच्या दिशेने प्रस्थान

-देशभरात 24 तासांत 47 हजार 704 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 654 जणांचा मृत्यू

-ऐश्वर्या-आराध्या कोरोनामुक्त; बिग बींना आनंदाश्रू झाले अनावर