महाराष्ट्रराजकारण

‘राज ठाकरे’ आमच्या सोबत आघाडीत नाहीत- शरद पवार

Newslive मराठी- मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही प्रश्नावर आमच्यासोबत असले तरी निवडणुकीत सोबत नसल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले, सांगोल्यात पत्रकारांशी  बोलताना पवार यांनी ही स्पष्टोक्ती केली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात ४८ पैकी ४४ जागांचे वाटप पूर्ण झाले असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. माझे वय झाल्याने मी माढातून निवडणूक लढवू नये असे सुचवणाऱ्या भाजप नेत्यांनी माझ्या प्रकृतीची काळजी करू नये असा टोलाही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा पंतप्रधानपदासाठी सुरू झाली असून यामध्ये आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. नितीन गडकरी हे माझे मित्र असून आता मला त्यांची काळजी वाटू लागली असल्याचे पवारांनी वक्तव्य केले.

Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi

बारामतीमध्ये भाजपाचं कमळ फुलणार – मुख्यमंत्री

काँग्रेसच्या बालेकिल्यात राष्ट्रवादीचा निधी

हे सरकार आहे की भिताड- अजित पवार