महाराष्ट्रराजकारण

दीड तास रांगेत उभे राहून राज ठाकरेंनी केले मतदान

Newslive मराठी- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुमारे दीड तास रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला.

दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान राज ठाकरे आपल्या कुटुंबासह दादर येथील बालमोहन शाळेत मतदानासाठी आले होते. तेथे मोठी रांग होती.  सर्वसामान्य मतदाराप्रमाणेच राजही मतदानासाठी रांगेत उभे राहिले.

दरम्यान, मुंबईत आज सेलिब्रिटी, कार्पोरेट जगतातील मतदारासह सर्वसामान्य मतदार रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावत आहेत.