महाराष्ट्रराजकारण

राजू शेट्टींना कोरोनाची लक्षणे, होणार होम क्वारंटाईन

कोरोनाचा फटका राजकीय नेत्यांना देखील होत आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्वतः ही माहिती दिली. मागच्या काही दिवसांपुर्वी ते कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यावेळी त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. याचबरोबर त्यांचे स्विय सहाय्यक यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह अल्याने ते सध्या उपचार घेत आहेत.

राजू शेट्टी म्हणाले की, बरेच लोक माझी सदिच्छा भेट घेण्यासाठी येत असतात. मी विविध कारणांसाठी महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात येऊन आपल्या परिवाराला धोक्यात न घालता, फोनवरुन चर्चा करा, मी उपलब्ध असेन. काल माझी कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली, पण काल रात्रीपासून मला थोडा ताप येऊन अस्वथ वाटू लागले.

त्यामुळे मी डॉक्टरांकडे जाऊन HRCT टेस्ट केली. त्यातून समजले की माझे फुफुस थोड्याप्रमाणात बाधीत झाले आहे. ही कोरोना पॉझिटिव्हची लक्षणे आहेत, असे त्यांनी सांगीतले. गेल्या अनेक दिवसांपासून शेट्टी हे महाराष्ट्रात दूधदर आंदोलन करत आहेत.