आंतरराष्ट्रीयमनोरंजन

हार्दिक पांड्यानंतर आता रणवीर सिंह ट्रोल

Newsive मराठी-  क्रिकेटर हार्दिक पांड्याने कॉफी विथ करण’ शोमध्ये महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर हार्दिक ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. ट्विटरवरून त्याच्यावर टीकाही झाली. त्यानंतर बीसीसीआयने बंदीची शिक्षा घातली. अनेक मान्यवर कंपन्यांनी हार्दिक आणि राहुलसोबतचा करार मोडला आहे. आता हार्दिकनंतर रणवीर सिंहला देखील ट्रोल केले जात आहे.

रणवीरचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत रणवीर महिलांवर आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहे. हा व्हिडिओ ‘कॉफी विथ करण’ या शोमधील असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रणवीर सिंह आधी करीना कपूरविषयी बोलतो. नंतर अनुष्का शर्माबद्दल. त्यानंतर, अनुष्का रणवीरला ओरडतानाही दिसतेय.