देश-विदेशमहाराष्ट्र

पाहिले राफेल विमान उडवले महाराष्ट्रातील ‘या’ पठ्ठ्याने!

Newslive मराठी-  बहुचर्चित राफेल फायटर विमान आपल्या भारतीय भूमीवर उतरल्यानंतर अवघ्या भारतीयांमध्ये उत्साह सळसळला होता. ही विमाने भारतीय भूमीवर उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा एक ट्वीट केले आणि तमाम भारतीयांच्या उत्साहात मोठी भर पडली. बऱ्याच काळापासून या तगड्या आणि जबराट विमानांची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत होती.

या फायटर विमानांमुळे भारतीय हवाई दलाचे बळ तुफान वाढले आहे. पण तुम्हाला माहित्ये का? पाहिले राफेल इमान उडविणारा पठ्ठ्या या महाराष्ट्राचा सुपुत्र आहे. ह्या इमान पायलट असणाऱ्या मराठवाड्यातील लातूरच्या पोराने अवघ्या महाराष्ट्राचे नाव मोठ्ठ केले आहे.

सौरभ अंबुरे असा त्याचे नाव असून तो एका मोठ्या पोस्टवर अधिकारी आहे. स्क्वाडरन लीडर असणाऱ्या सौरभ यांनी राफेल विमानातून गगनभरारी घेत पहिला राफेल विमान उडविण्याचा मान मिळवला आहे. महाराष्ट्राचे नाव या ना त्या कारणाने राजकारणात गाजत असतेच. पण राफेलच्या निमित्ताने गगनभरारी घेण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आणि त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रासह देशाचे नाव देखील अभिमानाने मोठे झाले आहे.

दरम्यान, या विमानामुळे आता शत्रू राष्ट्राला घाम फुटणार आहे. अनेक दिवसांपासून या विमानांची प्रतिक्षा भारताला होती ती आता पूर्ण झाली आहे. हरियाणामध्ये ही विमाने उतरविण्यात आली आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

-15 लाखांचे आश्वासन पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन- काँग्रेस

-मुख्यमंत्री राम मंदिर भूमिपूजनाला गेल्यास माझी हरकत नाही- शरद पवार

-“राम मंदिर बनताच करोना देशातून पळून जाईल”; भाजपाच्या महिला खासदाराचा दावा