आरोग्यमहाराष्ट्र

भारतात एका दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची विक्रमी वाढ

कोरोनाने देशभरात हाहाकार उडवला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. कोरोनाबाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. बुधवारी देशात आतापर्यंतची सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 76 हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर भारतातील कोरोनामुळे मृत्यूची संख्या 60 हजारांवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात गेल्या 24 तासात 76 हजार नवे रुग्ण आढळले. भारतात याआधी एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण 22 ऑगस्टला सापडले होते. तेव्हा एका दिवसात 70 हजार 488 जण पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 33 लाख 4 हजार 598 झाली आहे.

गेल्या आठवड्याभरात एका दिवसात कोरोना रुग्णांची संख्या 60 ते 65 हजाराने वाढत आहे. दुसरीकडे कोरोना टेस्टची संख्या वाढत असल्यानं पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त दिसून येत असल्याचंही म्हटलं जात आहे. 25 ऑगस्टला भारतात 8.2 लाख कोरोना चाचण्या झाल्या तर 26 ऑगस्टला 9.2 लाख चाचण्या घेण्यात आल्या. यामुळे कोरोना लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.