महाराष्ट्रराजकारण

“महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नाही, मोठ्या पक्षासोबत युती करणे योग्य”

देशात अनेक छोटे- मोठे पक्ष आहेत. छोटे पक्ष हे मोठ्या पक्षांबरोबर युती करताना दिसतात. सध्या राजकीय वर्तृळात अनेक घडामोडी घेताना दिसत आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. अशातच रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांनी एक महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र राज्यात रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नाही, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्वत प्रतिक्रिया दिली आहे. रिपब्लिकन ऐक्य केव्हाच मागे पडले आहे. आठवले कार्यकर्त्यांच्या इतर पक्षात जात आहेत. आणि एकाकी लढण्यापेक्षा मोठ्या पक्षाशी युतीच योग्य आहे, असे रामदास आठवले यांचे म्हणणे आहे.

गटबाजीने रिपब्लिकन पक्ष ग्रासून गेला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. प्रकाश आंबेडकरांशिवाय ऐक्याचे काही अर्थ नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, रिपब्लिकन पक्षाची जागा ही शिवसेनेने घेतली,असे म्हणत त्यांनी यावेळी सेनेवर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता रामदास आठवले कोणत्या मोठ्या पक्षासोबत युती करणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. आठवले भाजपची साथ सोडणार का हे लवकरच समजणार आहे.